सुट्टीचा दिवस खास कसा बनवायचा? एका क्लिकवर मिळवा आयडियाज





आठवडाभराच्या धावपळीनंतर रविवारी किंवा एखाद्या सुट्टीला कुठेतरी बाहेर जाऊन मन शांत करणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे प्रत्येकालाच आवडते. जर तुम्ही रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही सुट्टीच्या दिवशी काय करता येईल यासंदर्भातील काही टिप्स सांगणार आहोत.

  1. सुट्टीला एक दिवसाच्या ट्रिपसाठी शहराच्या जवळील पर्यटन स्थळे उत्तम ठरतील. जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत वेळ घालवायचा असेल तर धरण, डोंगररांगा किंवा थंड हवेचं ठिकाणं सर्वोत्तम असेल. येथील शांत वातावरणामुळे मनाला वेगळीच ऊर्जा मिळते. लहान मुलांसाठी आणि कुटुंबासाठी हे ठिकाण उत्तम पिकनिक स्पॉट ठरेल.
  2. इतिहास प्रेमींसाठी जुने किल्ले, वाडे आणि प्राचीन मंदिरे हा एक चांगला पर्याय आहे. सकाळी लवकर निघून गड-किल्ल्यांना भेट दिल्यास ट्रेकिंगचा आनंद तर मिळतो. तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या सानिध्यात काढलेला वेळ कधीही विसरता येणार नाही.
  3. ज्यांना शांततेत वेळ घालवायचा आहे त्यांनी लेकसाइड किंवा एग्रो-टुरिझम केंद्रांना भेट देऊ शकतात. ग्रामीण जीवनाचा अनुभव, गावरान जेवण आणि मोकळ्या हवेचा आनंद घेता यईल.

या गोष्टी महत्त्वाच्या –

  1. रविवारी निघताना वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.
  2. गर्दी टाळण्यासाठी सकाळी लवकर प्रवास सुरू करणे सोयीचे ठरते.
  3. सोबत आवश्यक ते खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचार साहित्य नक्की ठेवा.

हेही वाचा – टाकाऊ बाटल्यांपासून बनवा ‘होम डेकोर’



Comments are closed.