शिवसेनेचा आज महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा, नाशिकमध्ये खड्ड्यांनी घेतले आठ बळी

खड्डे अपघाताने शहरात आठ जणांचा बळी गेला आहे. अनेकजण जायबंदी झाले असून, काही जखमी मृत्यूशी झुंज देत असून नाशिककर संतप्त आहेत. त्यामुळेच निष्क्रिय सत्ताधाऱयांना जाब विचारण्यासाठी आणि शहर खड्डेमुक्त करण्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

आठ बळी जाऊनही शहरातील रस्ते नादुरुस्तच आहेत. अपघात होऊन नागरिक जखमी होण्याची मालिका सुरूच आहे. सत्ताधारी भाजपा आणि प्रशासन मात्र ढिम्म आहे. तात्पुरती मलमपट्टी करून जनतेची दिशाभूल सुरू आहे. सन 2017च्या महापालिका निवडणूक प्रचारातच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी शहर दत्तक घेण्याची घोषणा केली होती. विकासाऐवजी शहराची पुरती दैनावस्था झाली आहे. कुंमेळ्याच्या नावाखाली अख्खे शहर खोदून ठेवलेले आहे. मुख्य व गल्ली-बोळांतील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांना पायी चालणे कठीण झाले आहे. सर्वत्र वाहतूक काsंडीने नागरिक हैराण आहेत. भ्रष्ट, निष्क्रिय, ढिम्म प्रशासन, सत्ताधारी भाजपला जाब विचारण्यासाठी शिवसेनेने धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. जिल्हा संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर हे यावेळी हजर राहणार आहेत. खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, डी. जी. सूर्यवंशी, लोकसभा प्रमुख जयंत दिंडे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, माजी आमदार वसंत गीते, गटनेते केशव पोरजे मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाची जय्यत तयारी पदाधिकारी, शिवसैनिकांनी केली आहे.

कुंभमेळ्याच्या नावाखाली लूट!

कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकमध्ये फक्त लूट सुरू आहे, असे साधू-संतांनीच सांगितले आहे. ज्यांना खड्डे बुजवता येत नाहीत ते पुंभमेळा घ्यायला निघाले आहेत, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी सरकारला हाणला. देशातील रस्ते स्पेस टेक्नॉलॉजी वापरून तयार करू, असे सांगणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात काय स्पेस टेक्नॉलॉजी सुरू आहे, हे काल लाल किल्ल्यावरून पाहिलंच असेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

नगरसेवकांच्या घरात जाऊन जाब विचारा! संजय राऊत यांनी केली रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी

संजय राऊत यांनी रविवारी सायंकाळी मखमलाबाद रस्ता, गामणे मळा, शांतीनगर आदी भागांतील रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी केली. तेथील भाजी विव्रेते, स्थानिक महिला, व्यावसायिकांशी संवाद साधला. ‘नगरसेवकांना तुम्ही निवडून आणलंय, आता त्यांच्या घरात घुसून खड्डय़ांचा जाब विचारला पाहिजे. सगळीकडे जंतरमंतर सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकच काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमचे काहीही करू शकत नाहीत,’ असे संजय राऊत म्हणाले. ‘आम्ही कर्तव्य भावनेतून रस्त्यावर उतरलो आहोत. सोमवारी मोर्चा काढणार आहोत. तुम्हीही आमच्यासोबत रस्त्यावर उतरा,’ असे आवाहन त्यांनी यावेळी नाशिककरांना केले. यावेळी जिल्हा संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, गटनेते केशव पोरजे, भारती ताजनपुरे यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी त्यांच्या सोबत होते.

सरकारचे वस्त्रहरण करणारा मोर्चा – संजय राऊत

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहरात खड्डय़ांमुळे आठ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे, शंभराहून अधिक जखमी झाले आहेत, तरी इकडचे चंपतराय पुंभमंत्री निर्लज्जपणे सगळं पाहत आहेत. नाशिककरांसाठी आम्ही उद्या सोमवारी रस्त्यावर उतरणार आहोत. हा मोर्चा देवेंद्र फडणवीस सरकारचे वस्त्र्ाहरण करणारा आहे, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला.

Comments are closed.