महापौरांच्या पतीचे वादग्रस्त वक्तव्य; महायुतीत मिठाचा खडा माफी मागितली तरच शिंदे गटाला सहकार्य
उल्हासनगरमधील भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी १५ वर्षे फक्त कागदी घोडे नाचवले, असे वादग्रस्त विधान महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी केल्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. कमलेश निकम यांनी आमदारांची माफी मागितली नाही तर आम्ही शिंदे गटाला सहकार्य करणार नाही, चुकीच्या कामांचा विरोध करणार, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला आहे.
उल्हासनगरातील मेट्रो ट्रेनसह, पाण्याचा स्वतःचा स्रोत व इतर विविध विकासकामांच्या श्रेयवादावरून आमदार कुमार आयलानी आणि महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार जुगलबंदी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, आमदार कुमार आयलानी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि कमलेश निकम यांच्यावर घणाघाती आरोप केले.
Comments are closed.