ना डावे, ना उजवे; आम्ही संधीसाधू! समाजातील वाढत्या प्रवृत्तीवर नितीन गडकरींचे भाष्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

समाजकारण आणि राजकारणात मतभिन्नता असणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. विचारांमधील मतभेद ही समस्या नसून विचारशून्यता हीच खरी अडचण आहे. एखाद्याचा विचार पटला नाही, तर त्याचा सन्मान करता आला पाहिजे. परंतु, अलीकडे विचारधारा, तत्त्वांपेक्षा परिस्थितीनुसार भूमिका बदलली जात आहे. ‘ना डावे, ना उजवे, आम्ही संधीसाधू’ ही प्रवृत्ती वाढत आहे. अशा काळात एकनिष्ठ व्यक्ती समाजासाठी दीपस्तंभ ठरतात, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानतर्फे पत्रकारितेतील योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, आजच्या काळात व्रतस्थ आणि व्यावसायिक पत्रकारिता पाहायला मिळत आहे. राजकारणाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणारे लोक आज दुर्मीळ होत चालले आहेत, ही चिंतेची बाब आहे. पत्रकारिता हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम असून पत्रकारांनी समाजात परिवर्तन घडवण्याचे काम केले पाहिजे. यश मिळाले की सगळ्या गोष्टी योग्य वाटतात. विजयाचे अनेक बाप असतात; मात्र, पराभवाचे खापर कोणावर फोडता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

महापौर मंजूषा नागपुरे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.

  • अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी पुण्यात गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. अनेक मंडळांकडून मांडव आणि देखावे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Comments are closed.