शाळेत मुलासोबत रॅगिंग होतयं?

सरकारने शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंग विरोधात कडक कायदे केले आहेत. पण तरीही समाजात दिवसेंदिवस विकृती वाढत असून शाळा कॉलेजात जाणारी लहान मुलं यास बळी पडत आहेत. यामुळे आपल्या मुलांचा या विकृतांपासून बचाव कसा करावा? त्यासाठी मुलांना कसं घडवावं ?हे पालकांना माहीत असणेही आवश्यक आहे.

पूर्वी कंटाळा आला की शाळेला सुट्टी घेण्यासाठी मुलं डोकेदुखीचा, पोटदुखीचा बहाणा करत. पण जसा काळ बदलला तशा शाळेतील मुलांच्या मानसिकताही बदलल्या. यात काही मुलं आक्रमक तर काही घाबरट झाली आहे. हीच मुलं शाळा कॉलेजमध्ये दादागिरी करत इतर मुलांचा मानसिक शारिरीक छळ करतात. ज्याला रॅगिंग असे म्हटले जाते. अशा मुलांचा सामना करणे सामान्य मुलांसाठी आव्हानात्मक असते. मग शाळा कॉलेजात जाणे टाळण्यासाठी मुलं टाळाटाळ करतात. शाळेत जातानाच घाबरत जातात, आल्यावर शांत असतात, रडवेली असतात. तर काही मुलं चिडचिड करतात. यामुळे जर तुमची मुलही अशीच वागत असतील तर पालक म्हणून मुलांना या गोष्टी सांगा. त्यांना सतर्क करा. त्यामुळे आपल्याबरोबर काहीतरी चूकीचे होतय ज्याला रॅगिंग म्हणतात हे त्यांना कळेल आणि ते अन्यायाविरोधात उभे राहतील.

१-जर वर्गातील किंवा इतर वर्गातील सिनियर मुल तुमच्या मुलावर प्रेशर टाकत असतील, त्रास देत असतील तर तेथेच त्याला नकार द्यायचा. अजिबात घाबरायचं नाही. शिक्षकांना, पालकांना तात्काळ याबद्दल सांगायचं.

2-शाळा कॉलेजमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट मुलांकडून जाणून घेणे पालकांना सांगणे.

3.जर मुल कॉलेजमध्ये जात असेल तर त्याला व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियावर कोणी त्रास देत आहे का हे पालकांनी विचारावे. त्यासाठी मुलांना                विश्वासात घ्यावे.

4. पालकांनी मुलांना सांगावे कि मित्रांच्या सांगण्यावरून लगेचच काहीही करू नये. आधी विचार करावा. आई वडीलांना सांगावे.

५. मस्करी कुस्करी
जर शाळेत कोणी मुलाची सतत चेष्टा करत असेल कॉमेंटस पास करत असेल तर प्रत्येकवेळी त्याला हलक्यात घेऊ नये. पालकांना शिक्षकांना मुलांनी सांगावे.

यावरील गोष्टी जरी पालकांनी मुलांना सांगितल्या तरी मुल अलर्ट होतील. त्यामुळे रॅंगिगमधून होणारे अनेक अनर्थ टाळता .येतील. मुल बिनधास्त शाळा कॉलेजला जातील.

Comments are closed.