FIH Hockey World Cup 2026 – हिंदुस्थानच्या रणरागिणी कडाडल्या! दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत साजरा केला सर्वात मोठा विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

FIH Hockey World Cup 2026 मध्ये हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला आहे. आम्सटरडॅम येथील वेगनार स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 6-1 ने लोळवलं आहे. पहिल्या सत्रात सुनेलिता टोप्पोच्या मैदानी गोलच्या जोरावर हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात नवनीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर, तर सुशीला चानूने उत्कृष्ट मैदानी गोल करत मध्यंतरापर्यंत टीम इंडियाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरानंतर मुख्य प्रशिक्षक श्योर्ड मरिन यांच्या रणनीतीनुसार खेळताना तिसऱ्या सत्रात दीपिका, लालरेमसियामी आणि साक्षी राणा यांनी गोलची मालिका सुरु ठेवत टीम इंडियाची आघाडी 6-0 अशी मजबूत केली. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेच्या कायला दे वाल हिने एकमेव गोल नोंदवून पराभवातील फरक कमी केला. विश्वचषक इतिहासातील हिंदुस्थानचा हा सर्वात मोठा विजय ठरला असून, या विजयासह हिंदुस्थानने ‘पूल डी’ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. पुढील फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी हिंदुस्थानला इंग्लंडविरुद्धचा अंतिम साखळी सामना केवळ अनिर्णीत राखणे आवश्यक आहे.

Comments are closed.