जेसन संजयच्या ‘सिग्मा’ची नवी रिलीज डेट जाहिर, आता ‘दृश्यम 3’सोबत होणार टक्कर – Tezzbuzz

साउथ सुपरस्टार विजय यांचा मुलगा जेसन संजय आता मोठ्या पडद्यावर एका ब्लाॅकबस्टर पदार्पणासाठी सज्ज आहे. जेसन संजय हा ‘सिग्मा’ या चित्रपटाव्दारे या क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट मुळात 31 जुलै रोजी रीलीज होणार होता मात्र त्याचे वडील यांच्या जना नायकन या चित्रपटामुळे पुढे ढकलण्यात आला होता. आता प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. संदीप किशन अभिनीत हा चित्रपट आता 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शत हाईल, जो गांधी जयंती सुध्दा आहे. तसेच या दिवशी अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट दृश्यम 3 सुध्दा रीलीज होणार आहे.

अभिनेता जेसन संजयने स्वत: चित्रपटाची डेट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. त्याने एक पोस्ट शेअर करुन प्रदर्शनाची नवीन तारिख जाहीर केली. त्या पोस्टमध्ये संजयने लिहले की, या धमक्यासाठी 2 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा. सिग्मा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज आहे. सिग्मा मुळत: 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, पण जना नायकन या चित्रपटाच्या रीलीज मुळे या  चित्रपटाची तारीख पुढे गेली होती.

‘सिग्मा’मध्ये संदीप (sandeep)किशन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात फारिया अब्दुल्ला, राजू सुंदरम, संपत राज, शिव पंडित, अनबू थसन, योग जापी, मंगललक्ष्मी, शीला राजकुमार, कमलेश आणि किरण कोंडा हे कलाकारही आहेत. जेसन संजयचा चित्रपट ‘सिग्मा’ आता 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल, ज्यामुळे चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर लाँग वीकेंडचा फायदा घेता येईल असे दिसुन येत आहे. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा पांठिबा मिळतो आणि चित्रपट पसंतीस उतरतो का हे पाहण्यासारखे  असेल.

हेही वाचा

शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये नागपंचमीच्या दिवशी दिसले दोन साप; बचाव पथकाने एकाला पकडले, दुसऱ्याचा शोध सुरू

Comments are closed.