रिषभ पंतचा धडाका! रोहितनंतर आता शुबमन गिललाही मागे टाकलं, WTCमध्ये बनला नंबर-1

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने शानदार खेळी केली. संघाला जलद धावांची गरज असताना पंतने आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने 69 चेंडूंत 66 धावा केल्या. यात आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान पंतने शुबमन गिलच्या नावावर असलेला एक महत्त्वाचा विक्रम मागे टाकला. विशेष म्हणजे, गिलने यापूर्वी रोहित शर्माला मागे टाकले होते. आता पंत ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ (WTC) मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
गाॅल येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पंत 39 धावांवर बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून त्याने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. शुबमन गिलला मागे टाकून पंतने WTC मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला.
शुबमन गिलने ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या इतिहासात भारतासाठी 2767 धावा केल्या आहेत, तर पंतने या स्पर्धेत आतापर्यंत 2885 धावा केल्या आहेत. या यादीत 2716 धावांसह रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे.
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 10 खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. या यादीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांचे वर्चस्व आहे. पाकिस्तानचा बाबर आझम हा टाॅप 10 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव आशियाई फलंदाज असून तो सातव्या स्थानावर आहे.
इंग्लंडचा जो रूट या यादीत अव्वल स्थानावर आहे; त्याने आतापर्यंत 77 सामन्यांत 6651 धावा केल्या आहेत.
रिषभ पंतने 14 WTC सामन्यांच्या 73 डावांमध्ये 2885 धावा केल्या आहेत.त्याची सर्वोच्च धावसंख्या 146 असून त्याची फलंदाजीची सरासरी 41.81 इतकी आहे. पंतने WTC मध्ये 3870 चेंडूंचा सामना केला असून त्याचा स्ट्राईक रेट 74.54 आहे.
पंतने आतापर्यंत WTC मध्ये 6 शतके आणि 17 अर्धशतके नोंदवली आहेत. याव्यतिरिक्त, त्याने 314 चौकार आणि 80 षटकार मारले आहेत. WTC मध्ये पंतपेक्षा केवळ बेन स्टोक्सनेच अधिक षटकार मारले आहेत. स्टोक्सच्या नावावर 88 षटकार आहेत.
Comments are closed.