कसोटीमध्ये No-Ball बनला रवींद्र जडेजाचा अडथळा, ‘इतक्यांदा’ विकेट घेण्यापासून राहिला वंचित

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे, जी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 चा भाग आहे. यातील पहिल्या सामन्याला गॉल येथे 15 ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाची विकेट पुन्हा एकदा नो-बॉलमुळे हुकली.
नो-बॉलमुळे जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्व्हाची विकेट घेण्याची संधी गमावली. भारतीय फिरकीपटूच्या कसोटी कारकिर्दीत ओव्हरस्टेपिंगसाठी दिलेल्या नो-बॉलमुळे विकेट घेण्याची संधी गमावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तुम्हाला ती आकडेवारी जाणून धक्का बसेल, चला तर मग माहित करून घेऊ नक्की किती वेळा नो-बॉलमुळे जडेजाची विकेटची संधी हुकली.
जडेजा 2015 मध्ये मोहाली कसोटीत एबी डिव्हिलिअर्सची विकेट घेऊ शकला नव्हता, कारण होते नो-बॉल. तसेच 2017 ला नागपूरमध्ये झालेल्या कसोटीतही असेच काहीतरी घडले. तेव्हाही जडेजा ओव्हरस्टेपिंगमुळे श्रीलंकेचा फलंदाज दिमुथ करुणारत्ने याची विकेट घेऊ शकला नाही. त्याच वर्षी त्याने दिल्लीमध्ये श्रीलंकेचे ऍंजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडीमल यांचीही विकेट घेण्याची संधी गमावली होती, कारण तेव्हाही त्याने नो-बॉलच टाकला होता.
2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पुन्हा एकदा जडेजा ओव्हरस्टेप झाला होता. किंग्स्टनच्या त्या कसोटीमध्ये जडेजाने शमर ब्रूक्सला बाद करण्याची संधी गमावली होती. 2020 मध्ये ख्राईस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्ससोबतही असेच झाले. जडेजाने त्यालाही बाद केले होते, मात्र नो-बॉलमुळे निकोल्स वाचला होता.
मायदेशात 2023 मध्ये जडेजाला मोठा विक्रम करण्याची संधी होती, मात्र पुन्हा एकदा नो-बॉल अडथळा ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या कसोटी मालिकेत ओव्हरस्टेपमुळे जडेजाने तीन विकेट्स घेण्याची संधी गमावली. नागपूर कसोटीत स्टीव्ह स्मिथची विकेट गमावली, ती जडेजाची 250 वी विकेट ठरली असती. इंदौर कसोटीमध्ये मार्नस लाबुशेन आणि दिल्ली कसोटीमध्ये पीटर हॅंड्सकॉम्ब यांच्या विकेटबाबतीतही असेच घडले.
जडेजाची नो-बॉल आकडेवारी
कसोटीमधील मागील पाच वर्षांमधील नो-बॉल टाकणाऱ्या फिरकीपटूंची आकडेवारी पाहिली, तर पहिल्या स्थानावर जडेजा आहे. त्याने 2021 पासून 84 नो-बॉल टाकले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा नोमान अली आहे. त्याने याच कालावधीत निम्मे म्हणजे केवळ 40 नो-बॉल टाकले आहेत. (no-ball proved to be a hurdle for Ravindra Jadeja in Test, bowled most no ball in test by spinner)
Comments are closed.