Galle Test: केएल राहुल, देवदत्त पडिक्कल अन् ब्रोमान्स; कर्नाटक बॉईजचा ‘क्यूट व्हिडिओ’ एकदा पाहाच

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात गॉल येथे 15 ऑगस्टपासून पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांच्यातील एक मैत्रीचा क्षण पाहायला मिळाला, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
झाले असे की, भारताच्या दुसऱ्या डावातील 10.6 व्या षटकात प्रभात जयसूर्याने टाकलेला चेंडू ‘आर्म’ (फिरकी न घेता सरळ येणारा) होता आणि त्यात थोडा ‘ड्रिफ्ट’ही होता; राहुलने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटच्या आतल्या कडेला न लागता थेट त्याच्या मागच्या पॅडवर आदळला. श्रीलंकेने जोरादार अपील केले आणि पंचांनी बोट वर केले. राहुललाही विकेट गेल्याची खात्री पटली आणि तो माघारी पतरला, त्याक्षणी पडिक्कलने त्याला थांबवत रिव्ह्यू घेण्यास सांगितले.
रिप्लेमध्ये दिसले की, बॅटला चेंडूचा स्पर्श झाला नाही आणि चेंडूचा ‘इम्पॅक्ट’ही सरळ रेषेत (इन-लाइन) आहे, मात्र ट्रॅकरनुसार चेंडू स्टंप्सला न लागता वरून गेला. श्रीलंकेच्या खेळाडूंना आणि राहुललाही यावर विश्वास बसला नाही.
राहुलला विकेट न गेल्याचे हायसं वाटते आणि ‘रिव्ह्यू’ घेण्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्याने पडिक्कलला घट्ट मिठी मारून त्याचे आभार मानले. त्यावेळी जर हेल्मेट नसते, तर जवळजवळ राहुलने त्याला किसच केले असते.
राहुल तेव्हा 37 चेंडूंत 25 धावांवर आणि पडिक्कल 28 चेंडूंत 21 धावांवर होता. काही वेळानंतर जयसूर्याने त्याचा बदला घेतला आणि 14.4 षटकांत राहुलला 35 धावांवर बाद केले. तसेच पडिक्कलही 44 धावा करत बाद झाला. ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी केल्यामुळे भारताचा दुसरा डाव 193 धावसंख्येवर संपुष्टात आला.
Comments are closed.