युक्रेनचा रशियावर पुन्हा ड्रोन हल्ला, एक हिंदुस्थानी विद्यार्थी जखमी
युक्रेनने बुधवारी रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात एक हिंदुस्थानी विद्यार्थी जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मास्कोतील हिंदुस्थानी दूतावासाने घटनेची माहिती दिली. जखमी हिंदुस्थानी विद्यार्थी उफा येथील बश्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असल्याचे समजते.
हिंदुस्थानी दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेची माहिती दिली. दूतावास विद्यार्थी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सर्व आवश्यक मदत पुरवत आहे, असे पोस्टमध्ये नमूद केले आहे.
रशियन सरकारी माध्यमांनुसार, उफामधील एका तेल शुद्धीकरण कारखान्यावरही ड्रोनद्वारे हल्ला झाला. उफा हे रशियाच्या बाश्कोर्तोस्तान प्रदेशाची राजधानी आहे. हे मॉस्कोच्या पूर्वेकडील रशिया-युक्रेन सीमेवर वसलेले एक औद्योगिक शहर आहे.
Comments are closed.