कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट अन् कपिल देव यांच्या 43 वर्ष जुन्या विक्रमाशी बरोबरी! वाचा रेकॉर्ड सविस्तर

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाची सुरूवात धक्कादायक होईल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. दोन्ही संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्याच्या कसोटी मालिकेला बुधवारी (19 ऑगस्ट) सुरूवात झाली. पहिला सामना हेंडिग्ले येथे खेळला जात आहे. या कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीर अझान अवैस बाद झाला.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या पाकिस्तानी फलंदाजाची अशाप्रकारे बाद होण्याची ही दुसरी वेळ, तर एखाद्या इंग्लिश गोलंदाजाने असे करण्याची ही चौथी वेळ आहे. याबरोबरच भारतीय दिग्गज कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी झाली.
कपिल देव यांचा विक्रम नेमका कोणता?
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर एक विक्रम घडला. अझानला ऑली रॉबिन्सनने बाद केले. कसोटीमध्ये पाकिस्तानी खेळाडूची सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची दुसरी वेळ आहे. याआधी, म्हणजे जवळपास 43 वर्षांआधी, 1983 मध्ये देव यांनी पाकिस्तानच्या मोहसिन खानला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
इंग्लिश गोलंदाजांचा विक्रम
इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची इंग्लंडच्या गोलंदाजाची ही चौथी वेळ आहे. याआधी 1926 मध्ये मॉरिस टेटने ऑस्ट्रेलियाच्या बार्डस्ली याला, 1974 मध्ये भारताचे सुनील गावस्कर यांना जेफ अर्नोल्डने आणि 2007 मध्ये रायन साईडबॉटमने वेस्ट इंडिजच्या डॅरेन गंगा याला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. आता या विशेष यादीत रॉबिन्सनने प्रवेश केला आहे.
इंग्लंडमधील कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट
मॉरिस टेट विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लीड्स, 1926 (डब्ल्यू. बार्डस्ले)
जेफ अर्नोल्ड विरुद्ध भारत, बर्मिंगहॅम, 1974(सुनील गावस्कर)
रायन साइडबॉटम विरुद्ध वेस्ट इंडिज, चेस्टर-ले-स्ट्रीट, 2007 (डी. गंगा)
ऑली रॉबिन्सन विरुद्ध पाकिस्तान, लीड्स, 2026 (अझान अवैस)*
बाबर आझमच्या अनुपस्थितीत पाकिस्तानचे नेतृत्व सलमान आगाकडे
या मालिकेसाठी पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझमला देण्यात आले होते, मात्र तो सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला आणि सलमान अली आगाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच इंग्लंडच्या नेतृत्वामध्येही बदल झाला आहे.
बेन स्टोक्सच्या निवृत्तीतनंतर इंग्लंडचे नेतृत्वपद जो रूटकडे आले आहे.
Comments are closed.