दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या फायनलचं ठिकाण बीसीसीआयने बदललं! जाणून घ्या महत्वाची अपडेट समोर

बीसीसीआयने (BCCI) मागील वर्षी दुलीप ट्रॉफीच्या (Dulip trophy) सर्व सामन्यांचे लाईव्ह म्हणजेच थेट प्रक्षेपण केले नव्हते. तसेच, चाहत्यांना स्टेडियमवर जाऊन सामने पाहण्याची परवानगीही नव्हती. या गोष्टींमुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यंदाच्या हंगामातही बोर्डाने आपले सामने ‘सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्येच (Centre of Excellence) घेण्याचा निर्णय घेतला आहे, पण वेळापत्रकात मोठा बदल करून फायनलचे ठिकाण बदलण्यात आले आहे. तसेच, लाईव्ह प्रक्षेपणाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी 2026 चे सर्व सामने ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’मध्ये आयोजित करण्याचे ठरवले होते. मात्र, तिथे चाहत्यांना जाण्याची परवानगी नसल्यामुळे चाहत्यांना सामने पाहता येत नव्हते. या निर्णयामुळे बीसीसीआयवर बरीच टीका झाली होती. आता चाहत्यांना खूश करण्यासाठी बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी 2026 चा फायनल सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (M. A. Chidambaram stadium) घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Saikia) यांनी ही माहिती दिली आहे.
या स्पर्धेत टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत, त्यामुळे अनेक चाहत्यांना त्यांना प्रत्यक्षात स्टेडियममध्ये खेळताना पाहायचे होते.
गेल्या वेळी बीसीसीआयने मोजक्याच सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले होते, तर काही सामने चाहत्यांना पाहता आले नव्हते. ही समस्या सोडवत आता बीसीसीआयने सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहते टीव्हीवर ‘स्टार स्पोर्ट्स’ आणि मोबाईल म्हणजेच डिजिटल स्वरूपात ‘जिओ हॉटस्टार’वर दुलीप ट्रॉफी 2026 चे सामने पाहू शकतात.
विशेष म्हणजे, या स्पर्धेत 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) , इशान किशन (Ishaan kishan) , तिलक वर्मा (Tilak verma) आणि मोहम्मद शमी (Mohmmed Shami) हे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर वैभव सूर्यवंशीला मैदानात पाहण्यासाठी सर्व क्रिकेट चाहते खूप उत्सुक असणार आहेत.
Comments are closed.