Anti Stress Jewellery: अँटी-स्ट्रेस ज्वेलरीने खरंच ताण कमी होतो?
दागिने म्हणजे फक्त सौंदर्य वाढवणारी अॅक्सेसरी, असं आता राहिलेलं नाही. तर बाजारात स्पिनर रिंग, फिजेट ब्रेसलेट आणि ब्रीदिंग पेंडंटसारकाही ज्वेलरी उपलब्ध आहे. ताण किंवा अस्वस्थता जाणवत असताना त्यांना स्पर्श करणे, फिरवणे किंवा त्यांच्यासोबत श्वासावर लक्ष केंद्रित करणे काही लोकांना शांत होण्यास मदत करू शकते. जाणून घेऊयात नक्की कसा ताण कमी करते ही अँटी-स्ट्रेस ज्वेलरी
ही ज्वेलरी काम कशी करते?
1) स्पिनर रिंग
अंगठीचा बाहेरील भाग फिरवता येतो. अस्वस्थ वाटत असताना ती हळूवार फिरवल्याने लक्ष काही क्षणांसाठी चिंताजनक विचारांपासून हटू शकते.
2) फिजेट ब्रेसलेट
यातील बीड्स किंवा रिंग्स हाताने हलवता येतात. हाताच्या या छोट्या हालचालीमुळे वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते.
3) ब्रीदिंग पेंडंट
याचा वापर हळू आणि नियंत्रित श्वास घेण्याची आठवण करून देण्यासाठी केला जातो. काही लोकांना अशा श्वसन सरावामुळे रिलॅक्स वाटू शकते.
खरंच ताण कमी होतो का?
इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ज्वेलरी ताण किंवा अॅन्झायटीवर उपचार करत नाही. ती एक छोटी कोपिंग टेक्निक म्हणून उपयोगी ठरू शकते. स्पर्श, हालचाल किंवा श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने काही वेळासाठी मन दुसरीकडे वळू शकते. क्रिस्टल किंवा विशिष्ट दगडांमुळे ताण कमी होतो, मात्र यास ठोस वैज्ञानिक पुरावा मानू नये. सतत चिंता, तीव्र घबराट किंवा पॅनिक अटॅक होत असल्यास केवळ अशा दागिन्यांवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Comments are closed.