सुटं तेल विकू नका, विकत घेऊ नका! तुकाराम मुंढे यांचा इशारा
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता खाद्यतेलांकडे वळवला आहे. खाद्यतेलांमध्ये होणारी भेसळ कायमची रोखता यावी यासाठी राज्यात सुट्टय़ा खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सुटे तेल विकू नका आणि विकत घेऊ नका, असे बजावण्यात आले आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱया विव्रेत्याला 7 वर्षे कैदेपासून आजन्म कारावास होऊ शकतो. इतकेच नव्हे तर 3 लाख ते 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. एफडीएने 1247 खाद्यतेल नमुने तपासले, त्यापैकी 1142 निर्दोष आढळले तर 77 दोषयुक्त आढळले. 13 नमुने असुरक्षित असल्याचे दिसून आले. त्यामुळे खाद्यतेलाबाबत हे विशेष आदेश काढावे लागले असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
एफडीएला खाद्यतेल तपासणीत आढळलेल्या त्रुटी
- खाद्यतेल निर्मात्या अनेक उत्पादकांकडे लायसन्स, रजिस्ट्रेशनचा अभाव
- खाद्यतेलात मोठय़ा प्रमाणात भेसळ आणि ऑसिडिक, औद्योगिक ट्रान्स फॅट
z तेलाचा खरा स्रोत तसेच उत्पादन दिनांक लपविण्यात येतो - मुदत संपलेले तेल पुन्हा पॅक करून विक्री
- अॅगमार्कशिवाय तेलाची विक्री
- सुट्टय़ा प्रकारात खाद्यतेल विक्री
- फूड ग्रेड मटेरियल नसलेल्या वेष्टनाचा वापर
- घातक खनिज तेलाची वाहतूक झालेल्या टँकरमधूनच खाद्यतेलाची वाहतूक
- गंजलेल्या कॅनमध्येच पुन्हा तेलाचे पॅकिंग.
Comments are closed.