आयआयटी मुंबईत एआयचा नवा अभ्यासक्रम
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आधुनिक संगणक क्षेत्रातील वाढता प्रभाव लक्षात घेऊन आयआयटी मुंबईतर्फे ‘संगणकशास्त्र व कृत्रिम बुद्धिमत्ता’ (सीएस अँड एआय) या विषयातील ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांकडून या अभ्यासक्रमाची रचना आणि अध्यापन केले जाणार आहे. ऑनलाइन शिक्षणासोबत आयआयटी मुंबईच्या परिसरात प्रत्यक्ष कामाचा अनुभवही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
Comments are closed.