राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चुकीच्या पद्धतीने शरद पवार यांच्याकडून काढून घेतला; सुप्रिया सुळे यांचा हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांनी स्थापन केलेला आहे. यासंदर्भात अजित पवार गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आमची लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांच्याकडून काढून घेतला. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची आम्हाला अॅरेंजमेंट करून दिली आहे, असे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आयोगाच्या कारभारावर हल्ला चढवला.

राष्ट्रवादी पक्षाचे संविधान आणि मालकी शरद पवारांकडेच असून, हा पक्ष काढून दुसऱ्याला देणे हा मोठा अन्याय आहे. नियम-कायद्यांमध्ये मनमानी चालत नाही. हा देश संविधानाने चालतो. ही नैतिकतेची लढाई आहे, असे त्या म्हणाल्या. आमची लढाई ज्यांचा पक्ष आहे त्यांना मिळाला पाहिजे यासाठी आहे. आतापर्यंत आठ सुनावण्या सर्वोच्च न्यायालयात पार पडल्या. शरद पवार प्रत्येक सुनावणीला हजर होते. सुप्रीम कोर्टात आम्हाला सुनावणीची तारीख मिळत नाही, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

खोटय़ा केसेस खपवून घेणार नाही

बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणावरून बजरंग सोनवणे यांना लक्ष्य केले जात आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचे म्हणणे स्पष्ट आहे, गलिच्छ राजकारण कुणाच्याही घरापर्यंत आणू नका. जर कोणाकडून काही चूक झाली असेल तर आम्ही माफी करणार नाही; पण सरकारच्या माध्यमातून जाणीवपूर्वक आणि चुकीच्या पद्धतीने खोटय़ा केसेस केल्या गेल्या तर आम्ही ते खपवून घेणार नाही. याविरोधात रस्त्यावर उतरून लढू, असा इशारा त्यांनी दिला.

Comments are closed.