इंडिगोची वेबसाइट आठवड्यात दुसऱ्यांदा डाउन.

तिकीट बुकिंगवर परिणाम : अॅप लॉगिन-पेमेंटमध्येही समस्या

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतातील सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या ‘इंडिगो’ची वेबसाईट शुक्रवारी पुन्हा क्रॅश झाली. काही प्रवाशांना वेबसाईटवरून फ्लाईट बुक करता आल्या नाहीत. तर काही वापरकर्त्यांना मोबाइल अॅपमध्ये लॉगिन करतानाही समस्या येत होत्या. वेबसाईटवर फ्लाईट बुकिंग उघडल्यावर ‘डेटा उपलब्ध नाही’ असा संदेश दिसत होता. या आठवड्यात इंडिगो एअरलाईन्सच्या वेबसाईट आणि ऑनलाईन सेवांमध्ये व्यत्यय येण्याची ही दुसरी वेळ आहे. एअरलाईनने एक सेवा सूचना जारी करत सिस्टममध्ये अधूनमधून समस्या येत असल्याचे स्पष्ट केले होते. काही ग्राहकांना आमच्या ऑनलाईन सेवा वापरताना अडचणी येऊ शकतात. आमची टीम ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी काम करत असल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले होते. इंडिगोने प्रवाशांना थोड्या वेळाने त्यांचे डिजिटल चॅनेल पुन्हा वापरण्याचा सल्ला दिला होता. ज्या ग्राहकांना तात्काळ प्रवासासाठी मदतीची आवश्यकता आहे त्यांनी ग्राहक सेवा हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असेही सूचित करण्यात आले होते.

Comments are closed.