ठाणे महानगरपालिका ॲथलेटिक्स योजनेला पाच सुवर्णपदके

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नुकतीच पुण्यात प्रादेशिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ठाणे महानगरपालिका ॲथलेटिक्स योजनेच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्यपदक जिंकले. हे सर्व खेळाडू निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात रिसा फर्नांडिसने १०० मीटर, २०० मीटर आणि लांबउडी या प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात आरव विनेरकरने ४०० मीटर आणि ४x१०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक, तसेच १०० मीटर व २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ध्रुव शिरोडकरने २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक व ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक मिळवले.

तीन सुवर्णपदके पटकावल्यानंतर रिसा म्हणाली, “मी माझ्या सर्व स्पर्धाप्रकारांमध्ये माझी सर्वोत्तम कामगिरी केली. माझ्या या कामगिरीबद्दल मी आनंदी आहे.”

मीनल पालंडे आणि अशोक आहेर यांनी खेळाडूंचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.