नीरज चोप्राला रौप्यपदक
हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीनंतर दमदार पुनरागमन करत यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. मात्र, अवघ्या नऊ सेंटीमीटरने सुवर्णपदक त्याच्या हातातून निसटले. श्रीलंकेचा युवा भालाफेकपटू रुमेश पॅथिराजेने 88.14 मीटरची फेक करत लुसाने डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले, तर नीरजला 88.05 मीटरसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 28 वर्षीय नीरजने दुसऱया प्रयत्नात 88.05 मीटरची भन्नाट फेक केली. ही त्याची जून 2025 मध्ये पॅरिस डायमंड लीग जिंकल्यानंतरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
Comments are closed.