FIH Women’s World Cup 2026: टीम इंडियाने कडवी झुंज दिली! ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखले, मात्र स्पर्धेबाहेर…

एफआयएच हॉकी विश्वचषक 2026 मधील भारतीय महिला संघाचा प्रवास संपुष्टात आला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करूनसुद्धा भारतीय संघाच्या पदरी अखेर निराशा पडली. रविवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी ऍमस्टेलवीन येथे ऑस्ट्रेलियाला 0-0 असे बरोबरीत रोखल्यानंतर भारत स्पर्धेबाहेर झाला.

या सामन्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया आणि चीन या सर्वांचे प्रत्येकी दोन गुण होते, मात्र चीनचा गोल फरक -3 होता, तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा -2 होता. ऑस्ट्रेलिया पुढील फेरीत गेला, असे का? तर यामध्ये फरक इतकाच की भारताने दोन तर ऑस्ट्रेलियाने तीन गोले केले. यामुळे केवळ एका गोलच्या फरकाने भारत स्पर्धेबाहेर झाला.

भारताने पहिल्या टप्प्यात चीनविरुद्ध दोन गोल केले होते, तर ऑस्ट्रेलियाने याच टप्प्यात नेदरलॅंड्सविरुद्ध दोन आणि दुसऱ्या टप्प्यात चीनविरुद्ध एक गोल केला होता.

स्पर्धेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भारताने पाचपैकी केवळ एकच सामना गमावला. उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यापासून रोखणारे हेच एक कारण मोठे ठरले. दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला असता, तर भारताचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले असते. परंतु, हा सामना अनिर्णीत राहिला आणि केवळ एका गोल फरकामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले.

भारताचा प्रवास
बेल्जियम आणि नेदरलॅंड्समध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय आवश्यक होता. भारताने या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एकही सामना न गमावता दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला होता.
दुसऱ्या टप्प्यात नेदरलॅंड्सकडून 0-2 असा पराभव झाल्याने भारताचा मार्ग कठीण झाला. त्यामुळे पुढील फेरीत पोहोचण्यासाठी भारताला विजय आवश्यक होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना संपण्याची घोषणा होताच अनुभवी गोलकीपर सविता पुनियासह इतरांच्या डोळ्यात अश्रू आले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने चांगला खेळ केला. त्यांचे अनेक हल्ले परतवून लावले, मात्र सामन्याचा निकाल 0-0 राहिल्याने भारताला पुढे जाता आले नाही.

या पराभवानंतर भारत पूल ‘ई’ मधील अंतिम गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी राहिला. यामधील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत आपले स्थाने निश्चित केली आहेत. भारता आता तो 5 व्या- 6व्या स्थानासाठी खेळेल.

Comments are closed.