अमरावतीत जिल्हा महिला रुग्णालयाला भीषण आग; तीन बालकांचा मृत्यू, महायुती सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा
महायुती सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणाने तीन ताह्या बाळांचा बळी घेतला. अमरावतीमध्ये जिल्हा स्त्राr रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) आज सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱयांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांमध्येच आग भडकली. कर्मचाऱयांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत 36 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे आणखी प्राणहानी टळली.
सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास एनआयसीयू विभागातील एका व्हेंटिलेटरचा अचानक स्पह्ट झाला. त्यामुळे वॉर्डमध्ये आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण वॉर्ड कवेत घेतला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱयांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, काही मिनिटांमध्येच रौद्ररुप धारण केले. त्याच वेळी काही कर्मचाऱयांनी वॉर्डमधील बालकांना तत्काळ हलविण्यास सुरुवात केली. मात्र, तीन बालकांचे प्राण वाचविण्यात त्यांना अपयश आले.
दोषींवर कठोर कारवाई करा, शिवसैनिक आक्रमक
या घटनेनंतर शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या भेटीनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देत जाब विचारला. रुग्णालयातील व्हेन्टिलेटर तसेच इतर जीवनरक्षक यंत्रांची देखभाल करणाऱया अभियंत्यांसह अधिकाऱयांवर कारवाईची मागणी रेटून धरली. शहरप्रमुख प्रवीण हरमकर यांच्यासह शिवसैनिकांनी आरोग्यमंत्र्यांना अडवून त्यांना जाब विचारला. या प्रकरणी अभियंत्याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे.
हा केवळ एक अपघात नाही तर व्यवस्थेतील गलथानपणाचा नमुना आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
चार बालके जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
काही बालकांना पुढील उपचारासाठी जवळच असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) हलवण्यात आले आहे. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू असून एका बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या बालकाच्या हाताला आणि पायाला भाजले असून अन्य तीन बालके किरकोळ भाजली आहेत. काही बालकांना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली.
स्प्रिंकलन यंत्रणा पूर्णपणे बंद
आगीच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आग लागली त्यावेळी रुग्णालयातील स्प्रिंकलर यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याची माहिती खुद्द जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आग नियंत्रणात आणण्यासाठी असलेली यंत्रणाच बंद असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे
धुरामुळे गुदमरून मृत्यू
आग लागल्यानंतर वॉर्डमधील परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱयांनी धावपळ करून बालकांना बाहेर काढले, मात्र वॉर्डमध्ये मोठय़ा प्रमाणावर धूर पसरला. त्यात श्वास काsंडल्यामुळे तीन बालकांचा मृत्यू झाला. अवघ्या वर्षभरापूर्वी नवीन इमारतीत हा नवजात शिशू अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रुग्णालयाचे फायर ऑडिट केले होते की नव्हते? फक्त कागदावर दाखवले होते का किंवा फायर ऑडिट चुकीचे केले होते? या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत.
Comments are closed.