आंध्र प्रदेशचे मंत्री केएन नागेश्वर राव यांना ईडीने अटक केली आहे
अमरावती : ईडीने मद्य परिवहनातील अनियमिततेशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आंध्रप्रदेशचे माजी मंत्री करुमुरी नागेश्वर राव यांना अटक केली आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत ही कारवाई केली आहे. नागेश्वर राव हे मागील वायएसआरसीपी सरकारमध्ये नागरी पुरवठा मंत्री होते.याप्रकरणी ईडीने जून महिन्यात त्यांचे पुत्र करुमुरी सुनील कुमार यांना अटक केली होती. यापूर्वी ईडीने पित्रा-पुत्राच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. चौकशीनुसार राज्यात मद्याच्या परिवहनातील कथित वित्तीय अनियमिततांद्वारे सरकारी खजिन्याला 195.33 कोटी रुपयांचे नुकसान पोहोचविण्यात आले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी ईडीने मे महिन्यात पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. ईडीने या प्रकरणी राज्य बेवरेजेज कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक डोंथीरेड्डी वासुदेवर रेड्डी आणि मुख्य आरोपी कासिरे•ाr राजा शेखर रेड्डी यांना यापूर्वीच अटक केली आहे.
Comments are closed.