उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुवर्णकन्या स्वस्तिका घोषचा सत्कार, राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये जिंकले होते सुवर्ण पदक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये टेबल टेनिस खेळात सुवर्णपदक पटकावून हिंदुस्थानचे नाव उंचावणाऱया स्वस्तिका घोषचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ निवासस्थानी सत्कार करण्यात आला. स्वस्तिकाने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली होती. स्वस्तिकाने सांघिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, तर मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते.

पनवेलच्या सी.के.टी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या स्वस्तिकाने टेबल टेनिस खेळात ज्युनिअर लेव्हलपासून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंपून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे तिचा विद्या ज्योती फाउंडेशन यांच्या वतीने बॅट, शूज व बॅग तसेच विद्यापीठाचे सन्मानचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तिला आशीर्वाद दिले व पुढील स्पर्धेत पुन्हा विजेतेपद जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वस्तिकाचा लवकरच भव्य सत्कार सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे आश्वासन फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी स्वस्तिकाचे प्रमुख प्रशिक्षक व आई-वडील यांच्यासह महाविद्यालयातील प्रशिक्षक डॉ. विनोद नाईक, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, युवासेना सिनेट सदस्य आणि विद्या ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप सावंत, सरचिटणीस, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, का@लेज कक्ष पदाधिकारी दुर्गेश वैद्य, विस्तारक किरण फाटक आदी उपस्थित होते.

Comments are closed.