पालघरमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एका ३० वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घोडेला गाईन परिसरात घडली आहे. या विवाहितेशी संपर्क होत नसल्याने तिचा भाऊ गुजरातमधून पालघरमध्ये आला. त्यानंतर त्याला आपली बहीण घरात मृतावस्थेत आढळून आली.
घोडेला गार्डन परिसरातील फनेल इमारतीमध्ये पूजा मिश्रा ही आपल्या पतीसोबत राहात होती. पूजा खासगी कंपनीत नोकरी करत होती. पूजाचा भाऊ प्रदीप मिश्रा हा बहिणीला फोन करत होता. दोन दिवस संपर्क न झाल्याने प्रदीप सुरतहून बहीण राहात असलेल्या पालघरच्या घरी पोहोचले. घराला कुलूप होते मात्र आतमधून दुर्गंधी येत होती. त्याने तत्काळ पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममध्ये पूजाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

Comments are closed.