मोदी शहांनी सरकारपुरस्कृत जो दहशतवाद निर्माण केलाय त्याविषयी भागवतांनी अमेरिकेत भूमिका मांडावी – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते न्यूयॉर्कमधील ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन’ येथे 29 ऑगस्टला हिंदुस्थानींना संबोधित करणार आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी विरोध दर्शवला आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

”राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सरकारी संस्था किंवा उपक्रम नाही. आपल्या देशातील एक जुनी संघटना आहे. त्यांची एक विचारसरणी आहे. हिंदुस्थानात जशी लोकशाही आहे तशी अमेरिकेत देखील आहे. हिंदुस्थानात जरी नसलं तरी अमेरिकेतलं विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम आहे. विविध देशातले, विचारांचे लोकं आपले विचार मांडत असतात. भागवतांना तिथल्या संघांच्या लोकांनी निमंत्रित केलं असेल तर जागतिक लोकशाहीमध्ये सरसंघचालक हिंदुस्थानातल्या हुकुमशाहीबद्दल काय भूमिका मांडतात ते पाहावं लागेल. हिंदुस्थानात जो उद्वेग सुरू आहे, मोदी शहांनी सरकारपुरस्कृत दहशतवाद निर्माण केलाय त्याविषयी मोहनराव भागवतांनी भूमिका मांडावी अशी लोकशाही प्रेमींची भूमिका आहे. तरुणांचा उद्रेक, जंतरमंतरवरची बंडाळी, पॅलेट गनचा हल्ला, अश्रूधुर, तरुणांचा विद्रोह हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक घडामोडी घडतायत. त्यावर ते अमेरिकेत बोलतील अशी मला अपेक्षा आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.