हिल स्टेशनवर जाताना राहा अलर्ट





हिल म्हणजेच डोंगर दऱ्यावर फिरण्याचा आनंदच वेगळा असतो. विशेषत पावसाळ्यात अशा उंच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यंटक जाणं पसंत करतात. पण या सिझनमध्ये निसर्ग जितका सुंदर दिसतो तितकाच तो धोकादायकही ठरू शकतो. यामुळे या दिवसात फिरण्याचे प्लान करताना किंवा फिरताना नेहमी अलर्ट राहण्याची गरज असते.

प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसामुळे निर्सग फुललेला असतो. अशा हिरव्यागार निसर्गात फिरणे मोकळी हवा अनुभवणे हा प्रत्येकासाठी सुखद प्रसंग असतो. पण जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाचा असतो. या कालावधीत डोंगर दऱ्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी, पूल तुटणे, अचानक पूर येणे, विज पुरवठा खंडीत होणे अशा घटनाही घडण्याची शक्यता असते.

खरं तर या कालावधीत यात्रा करणे, डोंगराळ भागात फिरायला जाणेच धोकादायक आहे. यामुळे जर या दिवसात तुमचे बाहेर जाणे महत्वाचेच असेल तर जाण्याआधी अपेक्षित ठीकाणाची तेथील वातावरणाची तेथील आपत्कालिन सोयींची आधी माहीती घ्यावी. डोंगराळ परिसरात वातवरण कधीही बदलू शकते. त्यामुळे जाण्याआधी भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवर वातावरणाची योग्य माहीती तपासावी. त्यानंतरच फिरायला जाण्याचा निर्णय घ्यावा.



Comments are closed.