अमेरिकेत हत्या, उत्तर प्रदेशात अटक.
पार्टीसाटी बोलाविलेल्या युवतीची केली होती हत्या
वृत्तसंस्था /आग्रा
अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये निकिता गोडिशालाची (27 वर्षे) हत्या करणारा आरोपी अर्जुन शर्मा 15 दिवसांपासून स्वत:च्या आईसोबत आग्रा येथील एका फ्लॅटमध्ये राहत होता. सर्व्हिलान्समधून त्याचा ठावठिकाणा कळल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे.
मूळचा चेन्नईचा रहिवासी असलेल्या अर्जुन शर्माला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात इंटरपोलने नोटीस जारी केली होती. अर्जुन शर्मा आणि निकिता एकाच कंपनीत काम करत होते, त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरुन वाद झाला होता. यातूनच अर्जुनने अमेरिकेत निकिताची हत्या केली होती. यानंतर अर्जुन अमेरिकेतून भारतात आला होता. अमेरिकेच्या तपास यंत्रणांना हत्येमागे अर्जुनचा हात असल्याचे आढळून आल्यावर इंटरपोल नोटीस जारी करत त्याचा शोध सुरू झाला होता.
Comments are closed.