प्रसिद्ध ढोलकीवादक ज्ञानेश्वर ढोरे यांचे निधन
ज्येष्ठ ढोलकीवादक ज्ञानेश्वर ढोरे (70) यांचे अभ्युदयनगर येथील राहत्या घरी शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक लावणी आणि शाहिरी कलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात ज्ञानेश्वर ढोरे यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पार्थिवावर परळच्या भोईवाडा स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार झाले.
ज्ञानेश्वर ढोरे यांचा जन्म गिरणगावचा. त्यांच्या वडिलांचे स्वतःचे भजनी मंडळ होते. लहान वयात त्यांनी ढोलकी वादनाला सुरुवात केली. गेल्या आठवडय़ात ताप आणि श्वसनास त्रास झाल्याने त्यांची प्रपृती ढासळली. ढोरे यांनी दादा काsंडके, शाहीर साबळे, विठ्ठल उमप, अरुण सरनाईक, राम नगरकर, मधू कांबीकर यांसारख्या दिग्गजांना आपल्या ढोलकीची साथ दिली. ‘वस्त्रहरण’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘गाढवाचं लग्न’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘होनाजी बाळा’, ‘बावनखणी’ या नाटकांसाठी त्यांनी वादन केले. मॉरिशस, पॅरिस या देशांमध्येही त्यांची ढोलकी दणाणली.
Comments are closed.