एनटीएमध्ये केंद्राच्या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मध्ये केंद्र सरकारने दोन संचालक आणि एका सहसंचालकाची नियुक्ती केली आहे. आयपीएस रवी कुमार सिंग आणि आयएएस अधिकारी प्रसन्ना व्यंकटेश व्ही यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, आयएएस अधिकारी अमित सामदारिया यांची सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना तीन आठवड्यांत पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला नाही, तर त्यांना सेंट्रल स्टाफिंग स्कीममधून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणांनंतर एनटीए प्रशासनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एनटीएच्या परीक्षा पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदलांची घोषणा करण्यात आली असून, उत्तरपत्रिका तपासणीसाठी चारस्तरीय प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. याशिवाय, केंद्र सरकारने याआधीच ६०० तज्ज्ञांना प्रक्रियेतून काढून टाकण्याची घोषणा केली आहे.
Comments are closed.