हिंगोलीतील सरकारी शाळेत एक्स्पायर्ड अन्नाची पाकिटे; स्कूल ठीक करो मोहिमेअंतर्गत अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथील एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना एक्स्पायर्ड अन्नाची पाकिटे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉकक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी त्यांच्या स्कूल ठीक करो मोहिमेअंतर्गत या शाळेला भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आणला. त्यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर करून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दीपके यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाला थेट सवाल केला आहे की, “सत्तेत बसलेले लोक हेच खराब झालेले अन्न स्वतःच्या मुलांना खाऊ घालतील का?” तसेच “हे सत्य समोर आणल्यामुळे आमच्यावर एफआयआर दाखल होणार असेल, तर खुशाल करा, पण आम्ही सत्य उघड करणे थांबवणार नाही,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. दीपके यांच्या या आरोपामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळ सुरू असल्याचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्रातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात स्कूल ठीक करो ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत ते विविध ग्रामीण भागांतील शाळांना भेटी देऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई, मोडकळीस आलेली शौचालये, अपुरी बाके आणि सदोष पायाभूत सुविधा यांसारख्या समस्या सातत्याने मांडत आहेत.

Comments are closed.