Ratnagiri News – ‘सामना’ प्रभाव,एसटी प्रशासनाला जाग; बस स्थानकातील स्वच्छतागृहाच्या नळांचे नॉब बदलले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी बसस्थानकातील शहर विभागाच्या स्वच्छतागृहाची दूरवस्था दैनिक सामनाने उघडकीस आणली होती.या स्वच्छता गृहातील बेसीनच्या नळांचे नॉब गायब झाले होते.दैनिक सामनाच्या वृत्तानंतर रत्नागिरी एस.टी. प्रशासन जागे झाले त्यांनी स्वच्छतागृहात तात्काळ दुरूस्ती करत बेसीनच्या नळाचे नॉब नवीन बसवले आहेत.

एसटी महामंडळाने दोन रूपये स्वच्छता अधिभार लावल्याने तिकिट दरात वाढ झाली.स्वच्छता आवश्यक असल्याने प्रवाशांनी ही दरवाढ स्वीकारली. रत्नागिरी बसस्थानकातील शहर विभागातील पुरूष स्वच्छता गृहातील वॉश बेसीन जवळच्या नळाच्या वरचे नॉब गायब झाल्याचे वृत्त दैनिक सामनाने प्रसिद्ध केले होते.एकाचा नळाचा तुकडा पडला तर दुसऱ्याचा हॅंडलचं गायब झाले आहे.एसटी प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करत नवीन नॉब बसवले आहेत.

Comments are closed.