इंद्रप्रस्थ गॅसने सीएनजीच्या दरात वाढ केली आहे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड म्हणजेच आयजीएलने सीएनजीच्या दरात 3 रुपये 89 पैशांची वाढ केली आहे. तर इतर तीन कंपन्यांच्या सीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. या वाढलेल्या किमती आजपासून लागू झाल्या आहेत. आता दिल्लीत एका किलो सीएनजीचा दर 86.98 रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात सीएनजी जवळपास 10 रुपयांनी महागला. मे महिन्यानंतर ‘आयजीएल’ने आता 29 ऑगस्ट रोजी सीएनजीच्या भावात वाढ केली आहे. दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात दरवाढीची कोणतीही माहिती समोर आली नाही.
दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नव्या दरवाढीनंतर, राजधानी दिल्लीत आता सीएनजीचा दर 86.98 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये हा दर 95.59 रुपये, गुरुग्राममध्ये 92.01 रुपये आणि मेरठमध्ये 95.47 रुपये प्रतिकिलो झाला आहे. वेगवेगळ्या राज्यांनुसार कर वेगवेगळा असल्यामुळे शहरांनुसार दरांमध्ये थोडा फरक दिसून येतो.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संकट निर्माण झाले आहे. युद्धापूर्वीच्या तुलनेत एलएनजीच्या किमती आता जवळपास दुप्पट झाल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेनुसार आणि वाढत्या मागणीनुसार सीएनजीच्या वापरातही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. पश्चिम आशियातील संकट गडद झाल्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या मालवाहतुकीवर परिणाम झाल्याने जुलैपासून किमती दुप्पट वाढल्या आहेत.
Comments are closed.