साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 30 ऑगस्ट 2026 ते शनिवार 05 सप्टेंबर 2026
>> नीलिमा प्रधान
मेष – नोकरीत वर्चस्व दिसेल
शुक्र राश्यांतर. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी येतील. यश मिळवावे लागेल. नोकरीत वर्चस्व दिसेल. कामाची प्रशंसा होईल. धंद्यात सुधारणा होईल. जुना वाद, गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. शुभ दिवस. 2, 4
वृषभ – सावध भूमिका घ्या
शुक्र राश्यांतर. अनाठायी खर्च टाळा. मैत्रीत, नात्यात तणाव जाणवेल. सावध भूमिका घ्या. नोकरीत वरिष्ठांना मदत करण्यात यश मिळेल. नवीन परिचयावर भाळू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील.
शुभ दिवस. 30, 31
मिथुन- लोकप्रियता वाढेल
शुक्र राश्यांतर उत्साह, आत्मविश्वास वाढवणारे ठरेल. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल.
शुभ दिवस. 30, 31
कर्क – प्रेरणादायी कालावधी
शुक्र राश्यांतर प्रेरणादायी ठरेल. नवीन परिचय होतील. नोकरीमध्ये वाढ, बदल होईल. जुने येणे वसूल करा. धंद्यात मोठे काम मिळवा. कला, क्रीडा साहित्यात मन रमेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामे करून घ्या.
शुभ दिवस. 30, 31
सिंह – विचारांना चालना मिळेल
शुक्र राश्यांतर तणाव कमी करण्यास साहाय्य करेल. परिचयात वाढ झाल्याने विचारांना चालना मिळेल. कायद्याला धरून कृत्य करा. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल.
शुभ दिवस. 2, 5
कन्या – उतावळेपणा करू नका
शुक्र राश्यांतर दिलासा देणारे. उतावळेपणा, अतिरेक कुठेही नको. कोणतेही भाष्य करताना विचार करा. बुद्धिचातुर्य महत्त्वाचे ठरेल. टिका करू नका. धंद्यात वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समतोल राखून मुद्दे मांडा.
शुभ दिवस. ४, ५
तूळ – तडजोडीचे धोरण उपयुक्त
शुक्र राश्यांतर दिलासा देणारे ठरेल. तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे कामे करता येतील असे नाही. तडजोडीचे धोरण उपयुक्त ठरेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंद्यात चूक करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांकडे दुर्लक्ष नको. शुभ दिवस. 2, 5
वृश्चिक – चातुर्याचे कौतुक होइल
शुक्र राश्यांतर. नात्यात, मैत्रीत शब्द जपून वापरा. नोकरीत चातुर्याचे कौतुक होईल. कठीण कामे कराल. धंद्यात गुंतवणूक करताना योग्य सल्ले घ्या. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे गाजतील. लोकप्रिय व्हाल.
शुभ दिवस. 30, 31
धनु – नवीन परिचय प्रेरणादायी
शुक्र राश्यांतराने उत्साह वाढेल. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरीत बुद्धिमत्तेचा उपयोग कराल. धंद्यात स्पर्धा वाढेल. वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कीर्तीचा प्रभाव दिसेल. शुभ दिवस. ३१, २
मकर – व्यवहारात सावध रहा
शुक्र राश्यांतर, आत्मविश्वास वाढवणारे आहे. कला-साहित्यात विशेष काम कराल. अहंकाराची भाषा मात्र दूर ठेवा. तणाव, गैरसमज वाढतील. नोकरीधंदा टिकवा. व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या.
शुभ दिवस. 30, 31
कुंभ – परिस्थितीचा अभ्यास करा
शुक्र राश्यांतर मनावरील दडपण कमी कराल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. नोकरीत कठीण कामे करून घ्याल. धंद्यात नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचा अभ्यास करा. तुमचे महत्त्व, पद टिकवून ठेवा.
शुभ दिवस. ३१, २
मीन – अहंकारयुक्त भाषा नको
शुक्र राश्यांतर शारीरिक, मानसिक दडपण वाढवणारे. संयमी कृती ठेवल्यास यश मिळवता येईल. अहंकारयुक्त भाषा उपयुक्त ठरणार नाही. नोकरीत तणाव जाणवेल. धंद्यात तत्परता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निरीक्षण करा, अभ्यास करा.
शुभ दिवस. 30, 31
Comments are closed.