पंजाबमधील फिरोजपूरमध्ये आप नेते गुरप्रीत सिंग यांची हत्या.

कारमधून आले होते हल्लेखोर

फिरोजपूर : पंजाबच्या फिरोजपूरच्या ममदोट येथे आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कारमधून आलेल्या 4 हल्लेखोरांनी बाइकवरुन जात असलेले आप नेते गुरप्रीत सिंह यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचे सहकारी हरप्रीत सिंह जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक निवडणुकीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे प्रारंभिक तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी चौकशी सुरून असून आरोपींची ओळख पटविण्यात आल्याचे फिरोजपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक भूपिंदर सिंह यांनी सांगितले आहे. मुख्य आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो अवैध कारवायांमध्ये सामील राहिला आहे. जखमी हरप्रीत सिंह याने दिलेल्या माहितीच्या आधारावर हत्या अन् शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. या घटनेमुळे पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेवरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Comments are closed.