रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हिंदुस्तानातील पहिल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची हिंदुस्तानातील पहिल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे.नितीन बगाटे यांच्या संकल्पनेत साकारलेल्या रेडस् ॲपचे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे सादरीकरण करण्यात आले आहे.

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून रेडस् ॲप तयार करण्यात आले आहे.बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूपे तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध मोहीम राबविण्यात येते.रत्नागिरी जिल्ह्यातील 135 बेवारस व कुजलेल्या स्थितीतील मृतदेहांच्या चेहऱ्याच्या डिजीटल प्रतिकृती एआय तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आला त्यामध्ये 14 प्रकरणात ओळख पटविण्यात यश आले.जिल्ह्याबाहेरील 19 प्रकरणांपैकी 7 प्रकरणांमध्ये रेडस् ॲपच्या सहाय्याने ओळख पटविण्यात यश आले.रत्नागिरी जिल्ह्यातील 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात यश आले आहे.रेडस ॲपची दखल घेत प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी देशातील पहिल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये स्थान पटकावले आहे.

Comments are closed.