समृद्धी महामार्गावर आठवडाभर ‘ब्लॉक’, मुंबई व नागपूरच्या दिशेने वाहतुकीचा वेग मंदावणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आठवडाभर ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात आला आहे. सोमवारपासून ब्लॉक सुरू झाला असून तो 7 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. महामार्गावर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत सीसीटीव्ही पॅमेऱ्यांसाठी गँट्री लावण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी घेतलेल्या या ब्लॉकमुळे मुंबई आणि नागपूरच्या दिशेकडील वाहतुकीचा वेग मंदावणार आहे.

समृद्धी महामार्गावर सिन्नर इंटरचेज ते इगतपुरी इंटरचेजदरम्यान विविध टप्प्यांत ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यातील ब्लॉकची सुरुवात झाली. सिन्नर ते भरवीर इंटरचेजदरम्यान पहिल्या टप्प्यात सोमवारप्रमाणे मंगळवारी, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर रोजी काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत बंद राहील, तर नागपूरच्या दिशेने होणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत बंद राहील. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात भरवीर ते इगतपुरी इंटरचेजदरम्यान 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत बंद राहील. त्याचप्रमाणे नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत बंद राहील, असे प्रशासनाने कळवले आहे.

Comments are closed.