ठाणे पालिकेवर आदिवासींचे ‘उलगुलान’, शिंदे गटाच्या नगरसेविकेला अपात्र करण्याची मागणी
बोगस आदिवासी प्रमाणपत्रप्रकरणी शिंदे गटाच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांना अपात्र करावे या मागणीसाठी ठाण्यातील आदिवासी बांधवांनी सोमवारी ठाणे महापालिकेवर ‘उलगुलान’ मोर्चा काढला. मोर्चेकरांनी पालिका प्रशासन आणि चव्हाण यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘बोगस आदिवासी हटवा, खऱ्या आदिवासींना न्याय द्या’ अशा घोषणा आदिवासी बांधवांनी देत ठाणे महापालिका परिसर दणाणून सोडला. आदिवासी नेते लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला असून बोगस जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून पुन्हा एकदा ठाण्यात वातावरण तापले आहे.
Comments are closed.