२६ हजार किन्हवलीकरांची आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर, आरोग्य केंद्रात तुटपुंजी व्यवस्था

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून शासनाच्या लालफितीत अडकला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात तुटपुंजी व्यवस्था मिळत असल्याने २६ हजार किन्हवलीकरांची आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर आहे. प्राथमिक स्तरावर पुरेशा वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. या केंद्राची श्रेणीवाढ करून त्वरित ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नांदगाव, खरीवली, मुगाव, अस्नोली, अल्याणी या उपकेंद्रांचा कारभार चालतो. येथे सुमारे २६ हजार ८७ इतकी लोकसंख्या असून परिसरातील ५५ ते ६५ गावांतील नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी किन्हवलीत येतात. एकट्या किन्हवली गावाची लोकसंख्या ७ हजार ४४९ इतकी असून दुर्दैवाने किन्हवलीत एकही चांगले व सुसज्ज रुग्णालय नसल्याने रुग्णांना पुढील उपचारांसाठी शहापूर, मुरबाड किंवा कल्याण, ठाणे येथे जावे लागते. त्यामुळे शेकडो नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.

मंत्रालयात कोणतीही हालचाल नाही
२०२१मध्ये ४ कोटी ९८ लक्ष रुपये खर्च करून किन्हवल प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मुख् रुग्णालय इमारतीसह अधिकारी कर्मचारी निवासस्थाने बांधण्यान आली आहेत. २०२२मध्ये माज आमदार पांडुरंग बरोरा यांन तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. तानाज सावंत यांची भेट घेऊन आरोग्य केंद्राच्या श्रेणीवाढीची मागण केली होती. जुलै २०२४मध्ये सब त्रुटी दूर करून सुधारित प्रस्ताव मंत्रालयात सादर केला होता मात्र त्यानंतर कोणतीही हालचाल झालेली नाही.

Comments are closed.