एकाच टी20 सामन्यात दोन शतकं, शिमरॉन हेटमायरने CPL मध्ये रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर!

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) आतापर्यंत अनेक फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत शतके केली आहेत. 2013 पासून सुरु झालेल्या या वेस्ट इंडिजच्या स्थानिक टी20 लीगमध्ये आतापर्यंत जवळपास 36 शतके झाली आहेत, मात्र तुम्ही एकाच सामन्यात एकाच खेळाडूने दोन शतके केलेले कधी पाहिले आहे का? शिमरॉन हेटमायरने हे केले आहे. त्यामुळे तो अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

हेटमायरने CPL 2026 च्या 22 व्या सामन्यात म्हणजे, गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स आणि ट्रिनबागो नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यात ही अनोखी कामगिरी केली आहे. यावेळी त्याने आपल्या 100 व्या CPL सामन्यात शतकी खेळी केली आहे आणि अशाप्रकारे एकाच सामन्यात दोन शतके आपल्या नावे केली.

गयाना ऍमेझॉन वॉरिअर्सच्या या 29 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या 100 व्या CPL सामन्यात शतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने एका विशेष विक्रमाचीही बरोबरी केली आहे.

हेटमायरने ट्रिनबागो नाइट रायडर्सविरुद्ध 43 चेंडूंमध्ये नाबाद 111 धावा केल्या. 258.13 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या त्याच्या या वादळी खेळीत त्याने 9 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याने अवघ्या 40 चेंडूंतच 100 धावांचा टप्पा गाठला आणि CPL मधील सर्वात वेगवान शतकाचीही बरोबरी केली आहे.

हेटमायरच्या आधी, 2025 मध्ये टिम सेफर्ट आणि 2018 मध्ये आंद्रे रसेल यांनीही या लागीमध्ये प्रत्येकी 40 चेंडूंमध्येच शतके झळकावली होती. तसेच हे हेटमायरचे CPL कारकिर्दीतील दुसरे शतक होते आणि असे करणारा तो आठवा फलंदाज ठरला.

हेटमायर-शेफर्ट जोडीने शेवटच्या 5 षटकांत 94 धावा वसूल केल्या
हेटमायरबरोबर रोमारिओ शेफर्डनेही ट्रिनबागो नाइट रायडर्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने अवघ्या सात चेंडूंमध्ये 385.81 च्या स्ट्राईक रेटने 27 धावा केल्या. हेटमायर आणि शेफर्ड दोघांनी मिळून शेवटच्या पाच षटकांत 94 धावा केल्या.

पावसामुळे हा सामना 16 षटकांचा खेळला गेला. हेटमायर आणि शेफर्ड यांच्या वादळी खेळीमुळे गयाना ऍमेझॉन वॉरिअर्सने 16 षटकांत 5 विकेट्स गमावत 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात ट्रिनबागो नाइट रायडर्सचा संघ 16 षटकांत 7 विकेट्स गमावत 171 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला आणि गयानाने अवघ्या 9 धावांनी हा सामना जिंकला. (Shimron Hetmyer hit century in his 100th CPL match and equal this record, Trinbago Knight Riders vs Guyana Amazon Warriors)

Comments are closed.