ठाण्यातील कळवा पुलावर भीषण अपघात, भरधाव कारची वृद्ध रिक्षाचालकाला जोरदार धडक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाण्यातील नव्या कळवा पुलावर भरधाव कारने एका वृद्ध रिक्षाचालकाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. घोडबंदर रोडवरून ठाणे-बेलापूर रोडच्या दिशेने जात असताना पुलावर हा अपघात झाला. या दुर्घटनेत वृद्ध रिक्षाचालकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये चालकासह त्याचा एक साथीदारही होता. संबंधित कारवर नगरसेवकाचा स्टिकर लावण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच, कार चालवणारा युवक हा भिवंडीतील एका नगरसेवकाचा नातू असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. या घटनेची सखोल चौकशी करून अपघातास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन अपघाताचे नेमके कारण शोधावे आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

Comments are closed.