मुंबई इंडियन्सबाबत मोठी अपडेट, रोहित शर्मा निवडणार पुढील कॅप्टन!

मागील काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या ट्रेडबाबत बरीच चर्चा सुरू होती, आता त्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. स्टार अष्टपैलू आणखी एक हंगाम एमआयसोबत खेळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या ट्रेडबाबतची चर्चा पुढे गेलेली नाही. तसेच संघाच्या कर्णधारमध्येही बदलाची शक्यता असून या चर्चेत रोहित शर्माचा सहभाग असणार आहे, असेही वृत्त समोर येत आहे.
एमआयचा नवा कर्णधार कोण?
मुंबई इंडियन्स पुढील आयपीएल हंगामासाठी नव्या कर्णधाराच्या विचारात आहे. फ्रॅंचायझीला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा रोहित पुन्हा ही जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक नाही. त्यामुळे संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहेत. त्यामागे आणखी एक कारण म्हणजे हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह हे कर्णधारपदासाठीचे पर्याय आहेत. सद्यस्थिती पाहता तिलक सर्वात प्रबळ दावेदार आहे.
हार्दिकची ट्रेड
हार्दिकच्या ट्रेडबाबत पाहिले तर, रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्ससोबत चर्चा केली होती. तेव्हा केकेआरने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनला संभाव्या ट्रेड डिलमध्ये आणले होते, मात्र ग्रीनच्या पुढील वर्षातील कामाचा भार पाहता मुंबई ती डील पटली नाही.
तसेच हार्दिकला संघात घेण्याबाबत चेन्नई सुपर किंग्जनेही रस दाखवल्याचे वृत्त आहे, मात्र हे सर्व सीएसकेचा नवा प्रशिक्षक ठरल्यानंतरच होणार आहे.
सूर्याचे संघातील स्थान
रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव आयपीएलच्या पुढील हंगामासाठी एमआय संघात कायम राहण्याची शक्यता आहे. 2026 मधील त्याची कामगिरी खराब झाली होती, तरीही संघ त्याला 2027 च्या हंगामासाठी कायम ठेवण्याची शक्यता आहे.
तसेच मुख्य प्रशिक्षक म्हणून महेला जयवर्धने हे आपल्या पदावर कायम राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Big update regarding Mumbai Indians: Rohit Sharma to choose next captain! Hardik Pandya Trade)
Comments are closed.