Lionel Messi: एक मैदान, दोनदा निवृत्ती! ‘हे’ स्टेडियम पुन्हा ठरले मेस्सीच्या अखेरच्या सामन्याचे साक्षीदार

महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सोमवारी (31 ऑगस्ट) सर्वांना धक्का दिला. त्याने आपल्या 21 वर्षांच्या शानदार कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. यामुळे अर्जेंटिनाकडून त्याचा शेवटचा सामना न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर खेळला गेलेला फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना ठरला. याबरोबरच एक विलक्षण योगायोगही घडून आला आहे.
मेटलाइफ हे तेच स्टेडियम आहे जिथे मेस्सीने एका दशकात एकदा नाही, तर दोनदा मोठा धक्का दिला आहे. आपणा सर्वांना माहितच आहे की मेस्सीने याआधीही निवृत्ती घेतली होती. त्याने दहा वर्षांपूर्वी याच स्टेडियवर अर्जेंटिनासाठी शेवटचा सामना खेळला होता आणि निवृत्ती घेतली होती.
झाले असे की, 2016 मध्ये कोपा अमेरिका सेंटेनारिओचा अंतिम सामना मेटलाइफ स्टेडियमवर खेळण्यात आला होता. त्या सामन्यातील पराभवानंतर मेस्सी इतका निराश झाला होता, की त्याने डोळ्यात अश्रू आणून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पहिली निवृत्ती जाहीर करेपर्यंत मेस्सीने क्लब आणि वैयक्तिक स्तरावर विलक्षण कामगिरी केली होती, मात्र 2014 च्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना आणि तीन कोपा अमेरिका स्पर्धांच्या विजेतेपदाने हुलकावणी दिल्याने त्याला वाटले की तो देशाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकून देणार नाही. यामुळे त्याने निराश होत निवृत्ती घेतली होती.
तेव्हा मेस्सी म्हणाला होता, “मी माझा सर्वोत्तम प्रयत्न केला. माझ्याकडून जे शक्य झाले ते केले.”
नंतर जगभरातील आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी त्याला राष्ट्रीय संघात परतण्यास प्रेरित केले. त्यानंतर त्याने देशाला विजेतेपदे जिंकून दिली. त्याने अर्जेंटिनाला 2021 कोपा अमेरिका आणि ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती तो फिफा विश्वचषक जिंकला.
कतारमध्ये 2022 मध्ये झालेल्या त्या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सला पेनाल्टीमध्ये 4-2 ने पराभूत केले होते आणि मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार झाले होते.
10 वर्षांनंतर त्याच मैदानावरून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची समाप्ती
अर्जेंटिनाने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. 2026 फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना न्यू जर्सीमधील ईस्ट रदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर खेळला गेला. स्पेन विरुद्धचा तो सामना अर्जेंटिनाने 0-1 असा गमावला होता.
मेस्सी 2016 मध्ये एक स्वप्न अपूर्ण होत निवृत्त झाला होता, तर 2026 मध्ये एक विश्वविजेता आणि महान खेळाडू त्याच स्टेडियममधून कायमचा निरोप घेतला.
Comments are closed.