टीम इंडियाला मोठा धक्का, हार्दिक पंड्याला पुन्हा दुखापत; अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नाही?

भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक माहिती समोर येत आहे. हार्दिक पंड्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनामध्ये एक नवा अडथळा निर्माण झाला आहे. सध्या भारताचा स्टार अष्टपैलू बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये (CoE) दुखापतीतून सावरत आहे. तो आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून संघ पुनरागमन करणार होता, मात्र तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकला CoE मध्ये सरावादरम्यान पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. यामुळे त्याचे संघपुनरागमन लांबले आहे. त्याने यावर्षीच्या मार्च महिन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच काही दिवसांतच त्याचा अखेर फिटनेसचा अहवाल येणार होता, मात्र दुखापतीमुळे त्याच्या संघपुनरागमनावर पाणी फेरले आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघ निवडीसाठी या आठवड्यात बैठक होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका भारतात खेळली जात असली, तरी याचे यजमानपद अफगाणिस्तान भुषवणार आहे. तसेच हे तिन्ही सामने अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळले जाणार आहेत.
सूत्रानुसार, हार्दिक कोणत्याही अडचणींशिवाय सराव करू शकला असता, मात्र त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याची दुखापत किरकोळ असल्याने तो लवकरच मैदानात परतू शकतो, मात्र अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता कमीच आहे.
Comments are closed.