पाकिस्तानची हास्यास्पद अवस्था! थेट लिंक्डइनवरच दिली प्रशिक्षकाच्या नोकरीची जाहिरात

येत्या काही दिवसांत पीसीबी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आपल्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नवीन फील्डिंग कोचच्या (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) शोधासाठी थेट लिंक्डइनचा (LinkedIn) वापर केला आहे. शेन मैकडरमॉट यांनी मागच्याच महिन्यात या पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिकामे आहे. लिंक्डइनसारख्या प्लॅटफॉर्मवर क्रिकेट बोर्डाने अशा प्रकारे नोकरीची जाहिरात काढणे दुर्मिळ असल्याने लोकांना याचे मोठे आश्चर्य वाटत आहे.

या जाहिरातीसोबत बोर्डाने काही अटी आणि निकष (क्रायटेरिया) देखील दिले आहेत. पाकिस्तान संघ अनेकदा खराब क्षेत्ररक्षणावरून चर्चेत असतो आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांना खराब क्षेत्ररक्षणामुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत हसन अलीने सोडलेला तो कॅच. शाहीन अफरीदीच्या गोलंदाजीवर हसनने मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता, ज्यानंतर वेडने सलग तीन षटकार मारून पाकिस्तानकडून सामना जिंकून घेतला होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अर्ज करणाऱ्यांसाठी खालील पात्रता निश्चित केली आहे. उमेदवाराकडे किमान 5 वर्षांचा कोचिंगचा अनुभव असावा. तसेच त्याने यापूर्वी कोणत्याही देशाचा राष्ट्रीय संघ, फ्रँचायझी किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत काम केले असले पाहिजे. अर्जदाराकडे लेव्हल-2 (Level-2) क्रिकेट कोचिंगचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. बोर्डाच्या मते, त्यांना फक्त खेळाडूंना झेल पकडायला शिकवणारा प्रशिक्षक नको आहे, तर खेळाडूंना आणि सामन्याची परिस्थिती समजून घेऊन त्यांची क्षमता सुधारणारा प्रशिक्षक हवा आहे. तसेच त्याला आधुनिक क्षेत्ररक्षण तंत्रज्ञानाची चांगली जाण असावी. या पदासाठी अर्ज करण्याची 9 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक शेन मैकडरमॉट यांनी मागच्याच आठवड्यात पाकिस्तान संघाच्या फील्डिंग कोच पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पाकिस्तान सोडण्याचं नेमकं कारण सांगितलं नाही आणि पीसीबीकडूनही यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

Comments are closed.