जन्मतारखेचा खेळ अंगाशी आला! BCCI ची अ‍ॅक्शन आणि रोहितवर दोन वर्षांची बंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जन्मतारखेशी खेळ करण एका हिंदुस्थानी खेळाडूच्या चांगलच अंगाशी आलं आहे. BCCI ने थेट कारवाई करत त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. श्रीलंका दौऱ्यात चमकदार कामगिरी करणारा डावखुरा फिरकीपटू रोहित यादव चर्चेत आला होता. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे आणि मल्टी-डे मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र, त्याची एक चूक त्याला चांगलीच नडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वय पडताळणीदरम्यान रोहित यादवच्या कागदपत्रांमध्ये आणि आधार रेकॉर्डमध्ये गडबड आढळून आली आहे. रोहितने 2014 मध्ये बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदणी केली तेव्हा त्याची जन्मतारीख 7 जुलै 2007 अशी नोंदवली गेली होती आणि त्याचा पत्ता उत्तर प्रदेशचा होता. मात्र, 2017 आणि 2020 मधील आधार अपडेटमध्ये त्याच्या जन्माचे वर्ष 2006 करण्यात आले. त्यानंतर 2021 मध्ये यात पुन्हा बदल करून जन्मवर्ष 2006 वरून थेट 2009 करण्यात आले आणि 2024 पर्यंतच्या रेकॉर्डमध्ये ते तसेच ठेवण्यात आले, तसेच त्याचा पत्ताही बदलून हावडा आणि लिलुआ असा करण्यात आला. या सर्व तारखांच्या गोंधळामुळे BCCI ने कागदपत्रांची तपासणी केली आणि जन्मतारखेचा घोळ उघडकीस आला. त्यामुळे BCCI ने रोहित यादवर दोन वर्षांची बंदी घातली आहे.

Comments are closed.