बीसीसीआयची मोठी घोषणा; टीम इंडिया- जपान पहिल्यांदाच आमनेसामने! महत्वाची अपडेट समोर

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या रिपोर्टनुसार, आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) आपल्या मोहिमेची सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघ जपानविरुद्ध एक ऐतिहासिक टी20 सामना खेळणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पहिला सामना 28 सप्टेंबरला होणार असून, त्याच्या बरोबर 6 दिवस आधी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध हा सामना खेळवला जाईल. पुरुष क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि जपानचे संघ आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. भारत आणि (India and Japan) जपानमधील राजनैतिक संबंधांच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त हा ऐतिहासिक टी20 सामना आयोजित करण्यात येत असल्याची माहिती बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर दिली आहे.
बोर्डाने शेअर केलेल्या माहितीनुसार, हा सामना मंगळवार, 22 सप्टेंबर रोजी जपानमधील तोचिगी प्रांतातील साणो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी 9:30 वाजता सुरू होणार आहे. भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी दोन्ही देशांचे पुरुष क्रिकेट संघ 22 सप्टेंबर 2026 रोजी जपानच्या तोचिगी शहरात एक ऐतिहासिक टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळतील. हा सामना ‘स्पोर्ट 75’ (Sport 75) नावाच्या नवीन उपक्रमाचा एक भाग आहे, जो जपानी पंतप्रधान साने ताकाइची आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकीत ठरवण्यात आला होता.
खेळाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध आणि मैत्री अधिक दृढ करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तसेच, 2026 मध्ये भारताचे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्सच्या यजमानपदाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम तयार करण्यात आला आहे, जेणेकरून खेळाच्या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना मदत करू शकतील.
भारतीय क्रिकेट संघाने जपानमध्ये जाऊन हा टी20 सामना खेळणे अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, असे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Saikia) यांनी म्हटले आहे. जपानमध्ये आणि पूर्व आशियाच्या इतर भागात क्रिकेट लोकप्रिय करण्याची ही एक उत्तम संधी असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि जपानची मैत्री जुनी आणि अत्यंत मजबूत आहे, आणि खेळाच्या माध्यमातून या 75 वर्षांच्या नात्याचा उत्सव साजरा करणे हा खरोखरच एक विशेष अनुभव असेल, असेही ते म्हणाले.
आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नुकताच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Comments are closed.