ऋषी कपूर यांच्या जयंतीनिमित्त कुटुंबीयांनी जागवल्या जुन्या आठवणी, नीतू कपूर यांनी शेअर केला खास फोटो

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणी आजही त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. 4 सप्टेंबर रोजी ऋषी कपूर यांची 74 वी जयंती आहे. या निमित्ताने पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचा एक खास फोटो शेअर करत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिनेही वडिलांसोबतचा जुना फोटो शेअर करत त्यांची आठवण काढली.

नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ऋषी कपूर यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. ऋषी कपूर यांनी निळ्या रंगाचे जॅकेट, हिरव्या-काळ्या रंगाचा चेकर्ड मफलर आणि निळी जीन्स परिधान केली आहे. तर नीतू कपूर काळ्या रंगाच्या कार्डिगनमध्ये दिसत आहेत. या फोटोसोबत नीतू कपूर यांनी कोणतेही मोठे कॅप्शन लिहिलेले नाही. त्यांनी केवळ गुलाबी-लाल हृदय आणि फुलांचा इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिनेही सोशल मीडियावर आई-वडिलांसोबतचा जुना फोटो शेअर केला. या फोटोसोबत तिने वडिलांसाठी भावुक संदेश लिहिला. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा पापा. आज तारे तुमच्यासाठी थोडे अधिक चमकतील. मला तुमची प्रत्येक दिवशी आठवण येते,’ अशा शब्दांत रिद्धिमाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आजही त्यांच्या चित्रपटांमधील भूमिका आणि आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत.

Comments are closed.