शी जिनपिंग यांना दोनदा हृदयविकाराचा झटका, तिबेटच्या माजी पंतप्रधानांचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना गेल्या काही महिन्यांत किमान दोन ते तीन वेळा हार्ट स्ट्रोक येऊन गेला आहे, असा खळबळजनक दावा तिबेटच्या निर्वासित सरकारचे माजी पंतप्रधान लोबसांग सांगेय यांनी केला आहे. जर जिनपिंग यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली तर चीनमध्ये तात्काळ लष्करी उठाव किंवा तख्तापालट होईल, अशी भीती जिनपिंग यांना सतावत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

लोबसांग सांगेय यांनी एका मुलाखतीत हा दावा केला आहे. एका वरिष्ठ माजी चिनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी एका तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्या अधिकाऱ्यानेच जिनपिंग यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल आपल्याला सांगितल्याचे ते म्हणाले.

Comments are closed.