गोविंदा आला रे आला ! दहीहंडीनिमित्त पाठवा हे शुभेच्छा संदेश
आज सर्वत्र गोविंदा आला रे आला चा उत्साह आणि थरांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या खास प्रसंगी तुमचे आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना शुभेच्छा देऊन हा उत्सव अधिक आनंददायी बनवायचा असेल, तर खास शुभेच्छा संदेश पाहूयात.
आला रे आला गोविंदा आला.. दहीहंडी आणि गोपाळकाल्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
दहीहंडीचा हा सण तुमच्या आयुष्यात गोडवा, आनंद आणि उत्तुंग यश घेऊन येवो.. गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा !
श्रीकृष्णाच्या बासरीचा सुरेल नाद आणि हंडीतील मखमली दही-लोणी… तुमच्या आयुष्यात सदैव सुख-समृद्धी आणो.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा !
उंचावलेला मान आणि उंचावणारा दहीहंडीचा थर… तुमच्या आयुष्यातही असाच यशाचा उंच थर रचला जावो. दहीहंडीच्या शुभेच्छा !
दहीहंडीच्या या पवित्र दिवशी बालकृष्णाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रेमाचा काला, उत्साहाचा सण.. दहीहंडीच्या या मंगलमयी पर्वावर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..
हंडी फुटणार, गोविंदा गर्जणार .. उत्साहाच्या या पर्वाच्या सर्व दहीहंडी प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.. गोविंदा आला रे आला !
श्रीकृष्णाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा, प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळावे. गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा !
एकतेची ताकद आणि गोविंदांचा उत्साह… दहीहंडीचा हा जल्लोष तुमच्या आयुष्यात नवा रंग भरो. दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा !
हेही वाचा – दहीहंडीला करा मोरपीस,बासरी थीमचा आय मेकअप अन् नेल आर्ट
Comments are closed.